Tue. Sep 29th, 2020

#ManoharParrikar – गोव्यात नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची तयारी सुरु केली आहे.तर भाजपानेही मुख्यमंत्रीपदासाठी  नव्या मुख्यमंत्र्याचा शोध सुरू  केला आहे. भाजपने  रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या असून या बैठकीला मित्र पक्ष आणि काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.  या  बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही पर्याय निघू शकलेला नाही. सध्या भाजपाकडून प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच देखील नाव  चर्चेत आहे.

पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले.

पर्रिकरांच्या निधनानंतर भाजपा सरकार अडचणीत असून  काँग्रेसने गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला

भाजपाकडूनही हालचाली सुरु असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आमदारांची पणजीत बैठक झाली.

बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही पर्याय निघू शकलेला नाही.अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

गोव्यात बदलत्या परिस्थितीसाठी आम्ही नवीन पर्यायाचा विचार सुरू केला आहे. असं भाजपचे माध्यम समन्वयक संदेश साधले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गोव्याचे पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न राजकिय वर्तुळात रंगली आहे.

गोव्यातील सध्याचे संख्याबळ

गोवा विधानसभेचे संख्याबळ सध्या 40 वरून ३६ वर आले आहे.

विधानसभेत काँग्रेसचे १४, तर भाजपचे १२ आमदार आहेत.

गोवा फॉरवर्ड पार्टी ,मगोप यांचे प्रत्येकी तीन आमदार, एक अपक्ष आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार यांचा भाजपला पाठिंबा आहे.

गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार आहे.

गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा आघाडीत समावेश आहे.

केवळ पर्रीकर  यांच्यासाठीच इतर पक्षांनी  सरकारला पाठिंबा दिला आहे.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *