Wed. Aug 5th, 2020

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राज्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी संध्याकाळी निधन झालं. गेल्या वर्षभरापासून ते आजारपणाशी झुंझत होते. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता.

मनोहर पर्रिकर अत्यंत प्रामाणिक असे नेते होते. ते भारत मातेचे खरे राष्ट्रभक्त होते, परंतु त्यांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाले. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली.

त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली की, पर्रिकर लगेच कामाला लागत. प्रथम देश नंतर बाकीच्या गोष्टी अशा धारणेचे होते.

त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर कऱण्यात आला आहे, तर गोवा सरकारने 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 9.30 ते 10.30 यावेळेत भाजप प्रदेश कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर 10.30 वाजता त्यांचे पार्थिव पणजीच्या कला अकादमीत ठेवण्यात येणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत जनतेला त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

त्यानंतर दुपारी 4 वाजता SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार आहे.

दुपारी 4.30 वाजता SAG मैदान इथेच अंत्यविधी केली जाणार असून संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *