Thu. Dec 12th, 2019

ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मेगाब्लॉकचा फटका

मुंबई ते नाशिक असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गोदावरी एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पॅसेंजर 3 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

इगतपुरी येथे मेगाब्लॉक घेण्यात आला असून मागील 10 दिवसांपासून मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस आणि भुसावळ-मुंबई पेसेंजर अप आणि डाऊन दोन्ही बाजूने बंद होती.

मात्र आता पुन्हा मेगाब्लॉकच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. रेल्वेप्रशासनातर्फे यार्ड रिमोल्डिंगसह विविध कामे हाती घेण्यात आल्याने हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  

        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *