Fri. Jul 30th, 2021

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आता ५ दिवसांचा आठवडा असणार आहे. म्हणजेच आता राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ ५ दिवस काम करावं लागणार आहे.

राज्य सरकारची आज बुधवारी कॅबिनेट सभा पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी  २९ फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली होती. या बैठकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शासकीय अधिकारी आणि इतर सल्लागार उपस्थित होते.

याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आठवडा ५ दिवसांचा करणार असल्याचं संकेत दिले होते.

दरम्यान राज्य सरकारच्या झालेल्या मंत्रिमंडळात अनेक निर्णय घेतले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *