Jaimaharashtra news

Google CEO सुंदर पिचाई यांना ‘ग्लोबल लीडरशिप पुरस्कारा’ने सन्मानित

Googleचे भारतात जन्म झालेले सीईओ सुंदर पिचाई यांना यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी) या संस्थेचा प्रतिष्ठेचा ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सुंदर पिचाईसह नॅसडॅकच्या अध्यक्षा अॅडेना फ्रीडमॅन यांचीही निवड करण्यात आली आहे.

सुंदर पिचाई यांना ग्लोबल लीडरशिप पुरस्कार –

अमेरिकेचा यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल संस्थेकडून Googleचे सीईओ सुंदर पिचाई यांना प्रतिष्ठा ग्लोबल लीडरशिप पुरस्कार देण्यात आले आहे.

सुंदर पिचाईसह नॅसडॅकच्या अध्यक्षा अॅडेना फ्रीडमॅन यांचीही निवड करण्यात आले असल्याचे समजते आहे.

यूएसआयबीसीकडून देण्यात येणारा हा पुरस्कार भारत आणि अमेरिकेतील प्रसिद्ध आणि नावजलेल्या कंपनीपैकी देण्यात येते.

गेल्या पाच वर्षांपासून Google आणि नॅसडॅक कंपनीने चांगली कामगिरी बजावल्यामुळे हा पुरस्कार यंदा देण्यात येणार आहे.

दोन्ही कंपन्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाधारित मंचांची दखल घेऊन ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करणार आहे.

ग्लोबल लीडरशिप पुरस्कार संस्थेतर्फे २००७ पासून दरवर्षी दिला जात आहे.

 

 

 

Exit mobile version