Tue. Mar 9th, 2021

‘येथील’ सरकारच देतंय नागरिकांना कोरोना दरम्यान हस्तमैथुनाचा सल्ला

कोरोनाचं संकट जगावर कोसळल्यानंतर ठिकठिकाणी लॉकडाऊन ठेवण्यात आलं आहे. सर्वांना घरातच थांबण्याची सक्ती करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत भारतात कंडोमची विक्री २५ टक्क्यांनी वाढल्याचं एका सर्वेक्षणातून पुढे आलं आहे. मात्र त्याचवेळी सोशल डिस्टंन्सिंगमुळे जास्त एकमेकांच्या जवळ न जाण्याचाही सल्ला दिला जात आहे. न्यूयॉर्कच्या सरकारने मात्र नागरिकांना चक्क हस्तमैथुनाचा सल्ला दिला आहे.

आज जगभरात लॉकडाऊनमुळे लोकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत, टीव्हीवर विविध कार्यक्रम दाखवले जात आहेत. इंटरनेटचा वापर वाढला आहे.  मात्र अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये मात्र सरकारने भलताच सल्ला दिला आहे. चक्क हस्तमैथुन करण्याचा सल्ला येथील सरकारने आपल्या नागरिकांना दिला आहे.  

काय आहे हा सल्ला?

लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या रिसर्च ग्रुपच्या हवाल्याने असा सल्ला देण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात चुंबनामुळे COVID-19 चा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या काळात आपणच आपले सुरक्षित सेक्स पार्टनर बना आणि हस्तमैथुन करा, असा सल्ला देण्यात आला आहे. मात्र हे करताना साबणाने हात मात्र स्वच्छ धुवावेत, असं न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्यानेच आपल्या अधिकृत Twitter हँडलवरून म्हटलं आहे. हस्तमैथुनामुळे तणाव कमी होतो, असंही रिसर्च अहवालात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *