Fri. Jan 28th, 2022

राज्यपाल चिडले, केसी पाडवी यांच्यावर भडकले

महाविकासआघाडी सरकराचा शपथविधीचा कार्यक्रम विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. या शपथविधीच्या कार्यक्रमात एकूण 26 जणांनी कॅबिनेट तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

या शपथविधी कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संतापलेले पाहायला मिळाले.

नक्की काय झालं ?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार के.सी, पाडवी यांच्यावर संतापले. के. सी. पाडवी यांनी शपथ घेतल्यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

यावरुन राज्यपाल संतापले. राज्यपालांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. ठरलेल्या मजकूराशिवाय काहीच बोलयचं नाही, अशा शब्दात राज्यपालांनी पाडवी यांना सुनावले.

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा 28 नोव्हेंबरला शिवतिर्थावर पार पडला होता. यादरम्यान देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी मंत्रिपदाची शपथ घेताना मंत्र्यांनी आपल्या दैवतांची आणि पक्षश्रेष्टींची नाव घेतली होती.

कोण आहेत के.सी.पाडवी ?

के.सी.पाडवी हे सलग 7 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला आहे. पाडवी हे 1995 सालापासून अक्कलकुवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

तसेच पाडवी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रस कार्यकरणीचे सदस्य देखील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *