ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू
village panchayat elections in january

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: राज्यात कोरोना काळात अनेक ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित होत्या. दरम्यान, निवडणूक विभागाने राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी रोजी होणार मतमोजणी.आजपासून आचारसंहिता लागू – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची घोषणा pic.twitter.com/WTnJLy7G7F
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 11, 2020