Tue. May 11th, 2021

देशात आज मध्यरात्रीपासून नवी क्रांती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आज मध्यरात्री क्रांती घडणार आहे. कारण आज मध्यरात्रीपासून वस्तू सेवाकर अर्थातच जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. एक देश एक कर अशी ओळख मिरवणारा जीएसटी कर मध्यरात्रीपासून अंमलात येईल.

 

केंद्र सरकारनं अगदी दिमाखदार सोहळ्यात जीएसटी लागू करण्याचं ठरवलं आहे. नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्या स्वागताचाच जणू सोहळा ठेवण्यात आला आहे. रात्री 11 वाजता या सोहळ्याची सुरुवात होईल.

 

मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असेल. लॅपटॉपच्या सहाय्यानं जीएसटीचं औपचारिक स्वागत होईल. तसंच जीएसटीवरचे लघुपटही दाखवले जातील.

लोकसभा तसंच राज्यसभेतल्या सर्व खासदारांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, डावे तसंच इतर विरोधी पक्षांनी मात्र या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *