Tue. May 11th, 2021

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. यामुळे तंकारा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून गुडघ्याभर पाण्यातून नागरिकांना प्रवास

करावा लागतोय.

 

याठिकाणी बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली.  तर, काही भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आलेत.

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शुक्रवारपासून गुजरातमध्ये जोरदार पाऊस कोसळत असून या पावसामुळे

इथल्या अनेक भागात पाणी साचले.

 

यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झाले.  दरम्यान पुढचे तीन दिवस याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.

 

या पार्श्वभूमीवर अहमदाबाद महानगरपालिकेनेही संबंधिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *