Wed. May 18th, 2022

गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास

नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली आहे. दरम्यान आता, शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

बोदवड नगरपंचायत निकालावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात छुप्या युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा सुरू असतानाच, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले आहेत.

गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडेसेंना टोला लगावला आहे. बोदवड नगरपंचायत निकालाबाबत एकनाथ खडसे यांना काही बोलू द्या. खडसे विधानसभा निवडणुकीत पडले, आता बोदवड निवडणुकसुद्धा हरले. खरेतर ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत  होते, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

1 thought on “गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांचा एकाच गाडीतून प्रवास

  1. Howdy, i learn your weblog often and i personal an identical one and i used to be just wondering in case you get loads of spam comments? If so how do you forestall it, any plugin or anything you possibly can advise? I get a lot lately its driving me mad so any assistance is very a lot appreciated. Anyway, in my language, there arent much good supply like this.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.