गुरु रंधावाने केला साखरपुडा?

वेदांगी कर्णिक, मुंबई :- गायक गुरु रंधावा एका महिलेसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताच त्याने साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय आहे. या फोटोमध्ये गुरू एका मुलीचा हात पकडून हसत असल्याचं दिसून येतंय. मात्र या फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नाही आहे. नवीन वर्ष, नवीन सुरूवात” असं कॅप्शन गुरूनं त्या फोटोला दिला आहे. त्यामुळे तो त्या मुलीसोबत लग्नबंधनात अडकणार की काय असं प्रश्न नेटकरी उपस्थित करतायेत.
गुरु त्याच्या पॅटोला, सूट सूट, हाय रेटेड गॅब्रू, लगडी लाहोर दी, बन जा तू मेरी राणी आणि इशारे तेरे यासारख्या चार्टबर्टरसाठी ओळखला जातो. आता लवकरच कळेल की नक्की लग्नाची शेहनाई वाजणार आहे की आजून काही.