अपंगांच्या T-20 विश्वचषकात भारताचा दणदणीत विजय

अपंगांच्या T-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला विजय प्राप्त झाला आहे. हा सामना इंग्लंड आणि भारतामध्ये रंगला असून भारत संघाने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत केले. रविंद्र संते आणि कुणाल फणसे यांच्या दमदार खेळीमुळे भारताला विजय मिळाला आहे. भारताने इंग्लंडला 181 धावांचे आव्हान दिले असून इंग्लंडने 144 धावा केल्या.
भारताचा दणदणीत विजय –
अपंगांच्या T-20 विश्वचषक क्रिकेट सामना भारत आणि इंग्लंडमध्ये रंगला.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे.
भारताने 181 धावांचे आव्हान देत इंग्लंडला 144 धावा करत आपला खेळ आटोपला.
भारत संघाचा गोलंदाज सनी गोयतने इंग्लंडच्या सलामीवीर जेमी गुडविनला बाद केले.
मात्र अँगुस ब्राऊन आणि कॅलम फ्लीन यांनी चांगली खेळी करत सामना आणखी रंगतदार केला.
इंग्लंडने अटीतटीचा सामना खेळत असताना इंग्लंडच्या फलंदाज माघारी परतले.