Thu. May 19th, 2022

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूनी दिली प्रेमाची कबूली

क्रिकेट आणि बॉलीवूडचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे फार जवळचे संबंध राहिले आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूने एका अभिनेत्रीसोबत फोटो शेअर केला आहे.

याफोटोसह त्याने आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

Starting the year with my firework ❣️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक सोबत फोटोमध्ये दिसत असलेली दुसरी तिसरी कोणी नसून एक्टर आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविक आहे.

हार्दिकने फोटो शेअर करताना ‘माझ्या फायवर्कसोबत नव्या वर्षाची सुरुवात’ अशी कॅप्शन दिली आहे. तसेच सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

याआधी हार्दिक-नताशा या दोघांना सोबत पाहिलं आहे. त्यामुळे हे दोघे चर्चेत होते. नताशाने हार्दिक पांड्याच्या 26 व्या जन्मदिवसानिमित्ताने नताशाने इंस्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट केला होता.

नताशाने ‘नच बलिये’ या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. नताशाने अर्जून रामपालच्या ‘डॅडी’ सिनेमाची एक भाग होती.

तसेच ‘फुकरे रिटर्न्स’ सिनेमातील ओ मेरी मेहबूबा या गाण्यावर थिरकली होती.

याआधी हार्दिकचे अनेक अभिनेत्र्यांसोबत नाव जोडले गेले होते.

दरम्यान हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.