कार्डिअॅक अरेस्टमुळे हार्दिक पांड्याच्या वडिलांचं निधन
पांड्या कुटंबावर दुःखाचा डोंगर…

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाल्यानं बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं असून वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. शिवाय सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती.
क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. तसेच हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही. आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे. मात्र सध्याला हार्दिक पांड्याच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.