Mon. Jan 27th, 2020

हार्दिक पांड्याचं धोनीबद्दल मोठं विधान

टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच आता हार्दिकने धोनीबाबत एक मोठं विधान केलं आहे.

धोनी त्याच्या अनेक हटके खेळीसाठी ओळखला जातो. तसाच धोनी हा क्रिकेटमधील बेस्ट फिनीशर म्हणून ओळखला जातो. धोनीच्या फिनीशरच्या भूमिकेवरुन हार्दिकने विधान केलं आहे.

काय म्हणाला हार्दिक ?

मी एका फिनीशर म्हणून धोनीची कधीही जागा घेऊ शकणार नाही. मी याबाबतीत कधी विचारदेखील करु शकत नाही.

धोनीच्या बाबतीत पांड्याने आदरपूर्वक ही प्रतिक्रिया दिली. तो एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलत होता.

फिनीशर म्हणून टीममध्ये धोनीची जागा घेण्यासाठी मी पात्र ठरु शकणार नाही. मी आव्हानासाठी तयार आहे.

पण मी जे काही करेन ते टीमसाठी करेन, असं हार्दिक म्हणाला.

हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून टीम बाहेर आहे. हार्दिक अखेरची टी२० मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

तसेच धोनीदेखील वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे.

दरम्यान टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील ३ टी-२० सामन्यातील शेवटची मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे.

पहिली टी-२० पावसामुळे रद्द करण्यात आली होती. तर दुसरी मॅच टीम इंडियाने जिंकली. त्यामुळे १-० अशी आघाडी टीम इंडियाने घेतली आहे.

त्यामुळे सीरिजमधील शेवटची मॅच कोण जिंकतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *