कर्करोगावर प्रभाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना….
कर्करोग म्हणजे काय हे जाणून घेऊया?

कर्करोग हा आता एक सामान्य आजार असून या आजाराची प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे की नक्की कर्करोग आहे तरी काय? कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. कर्करोग कोणत्याही पेशींमध्ये, कोणत्याही उतींमध्ये किंवा अवयवांमध्ये होऊ शकतो. शरीरातील हाडं, स्नायूं, रक्ताचा कर्करोग, गर्भाशयाचा, यकृत, मोठे आतडे, अन्ननलिका आणि तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. याशिवाय पाठीचा कणा आणि मेंदूतही कर्करोगाच्या पेशींचा विकास होऊ शकतो.
कर्करोग हा अतिशय गंभीर आजार आहे. अनुवांशिकता हे कर्करोग होण्यामागील प्रमुख कारण आहे. या आजाराने पिडीत अनेक रूग्ण वर्षांनुवर्ष उपचारावर असतात. या आजाराचे वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो. असं डॉ. पुजा भिंगार्डे यांनी सांगितलं आहे. जगभरात होणाऱ्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यूंचे कारण कर्करोग हेच आहे.
कर्करोग होण्याची मुख्य कारणेः-
कर्करोग नेमका का आणि कशामुळे होतो, याचं कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, कर्करोग होण्यामागील काही मुख्य कारणं आहेत…
• बदलती जीवनशैली हे कर्करोग होण्याचे एक कारण आहे
• जंकफुड, धुम्रपान, दारूचे सेवन, प्रदूषण, रेडिएशन यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
• शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास या आजाराचा धोका जास्त असतो.
• कुटुंबात कोणाला कॅन्सर झाला असेल तर पुढच्या पिढीला कॅन्सर होण्याची शक्यता असते.
• खते, किटकनाशके, हानिकारक रसायने कर्करोगास कारणीभूत ठरतायेत
• वारंवार क्ष-किरण किंवा सूर्यप्रकाशापासून किरणोत्सर्गाचे विकिरण झालेल्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळेही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
कर्करोग होण्याची लक्षणे –
कर्करोगाचे अनेक प्रकार आहे. प्रत्येक कर्करोगानुसार त्याची लक्षणं ही वेगवेगळी असतात. परंतु, सामान्य स्वरूपात कर्करोगाची काही लक्षणं खालीलप्रमाणे आहेत…
• अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
• प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किंवा कमी होणं
• आतड्यात व मूत्राशयाच्या अस्थिरतेमध्ये बदल
• अचानक रक्तस्त्राव होणं
• त्वचा काळी पडणे, त्वचेवर गाठ जाणवणे
• सतत सर्दी व खोकला होणे
• जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या अपचनाची समस्या जाणवणं
• शरीरातील स्नायू किंवा सांधे दुखणे
• जखम पटकन भरून न येणं
• वारंवार ताप येणं
आधुनिक उपचारांमध्ये सामान्यत:- केमोथेरपी, रेडिएशन, तोंडावाटे औषधोपचारांचा समावेश करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त आयुर्वेद, निसर्गोपचार, योग आणि जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास कर्करोगावर प्रतिबंध करता येऊ शकतो. सर्व प्रकारच्या आजारांवर हा प्रभावी उपाय आहे. याशिवाय आयुर्वेदात कोणत्याही विकारावर प्रतिंबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध आहेत.