Wed. Dec 1st, 2021

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अनेक बंधारे पाण्याखाली

ल्या दोन दिवसात संपुर्ण महाराष्ट्रभर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासात पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, वर्धा, कोल्हापूर,रत्नागिरी,नाशिक,रायगड,बुलढाणा,सातारा, पुणे या शहरांसह संपुर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

गेल्या दोन दिवसात संपुर्ण महाराष्ट्रभर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासात पावसाने झोडपून काढले आहे. मुंबई, वर्धा, कोल्हापूर,रत्नागिरी,नाशिक,रायगड,बुलढाणा,सातारा, पुणे या शहरांसह संपुर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार

मुंबई

मुंबईसह उपनगरांत गेल्या २४ तासात पाऊसाने कहर केला आहे. मुंबई उपनगरांत 150 ते 180 मीमी तर मुंबई शहरात 50 ते 100 मीमी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे.कल्याण-कर्जत-खोपोली दरम्यान लोकलसेवा ठप्प आहे . अंबरनाथ, बदलापूर वांगणी दरम्यान उल्हास नदी ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे

वर्धा

वर्ध्यात आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे . जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसत आहे . पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे . जिल्ह्यात आज एकूण 155 मिमी पावसाची नोंद झाली आहे . आर्वी , हिंगणघाट , सेलू तसेच वर्धा तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे .

कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 10 फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा दुसऱ्यांदा पत्राबाहेर जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरण 84 टक्के भरले असून जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाउस बरसत आहे. या पावसामुळे चिपळूण शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. बाजारपेठेत 7 फूट एवढं पाणी साचल आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचं मोठ नूकसान झालं आहे. शहरातील अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरुप आलं असून तर नदीकाठच्या शेतजमीनी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात एकूण 597 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी 212 तर त्रंबकेश्वरला 140 मिमी पाऊस- त्रंबकेश्वर मध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे. गावात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून मंदिरासमोर लावलेल्या पर्यटकांच्या गाड्या अडकल्या आहेत. एका गाडीत अडकलेल्या ड्राइवरला पुजाऱ्यांनी गाडीची काच फोडून बाहेर काढलं आहे.

रायगड

गेल्या दोन दिवसांपासुन धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासुन रायगडमध्ये पुर परीस्थिती निर्माण झाली. सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलीका नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असुन महाड आणि नागोठण्यामध्ये नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खामगाव, नांदुरा, लोणारसह जिल्ह्यात पावसाची रात्री पासून दमदार बॅटींग सुरू आहे. नदी नाल्यांना पूर आले असून पूर्णा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे. बोर्डी नदीला पण पूर रात्र भर झालेल्या पावसाने शेतकरी आनंदीत झाला आहे.

सातारा

साता-यात पावसाची संततधार सुरु असून महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ वाढ झाली आहे.

पुणे

पुणे शहर परिसरात काल दिवसभर संततधार पावसाने खडकवासला धरणक्षेत्रातील पाणी साठा एका रात्रीत 1.35 टीएमसीने वाढला. काल सायंकाळ 5 वाजेपर्यत 15.39 टीएमसी पाणीसाठा होता तो आज सकाळी 7 वाजता 16.74 टीएमसी झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला धरणक्षेत्रात 25.06 टीएमसी एवढा पाणी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पाऊस कमी पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *