Sun. Oct 17th, 2021

GYM मध्ये व्यायाम बेतला तरुणाच्या जीवावर!

सध्या बॉडीबिल्डिंगसाठी Heavy exercise चा trend  सुरू झालाय. सलमान खान, हृतिक रोशन, जॉन आब्रहम, टायगर श्रॉफ यांसारख्या सुपरस्टार्सना फॉलो करणारा युवा वर्ग bodybuilding  साठी अतिरेकी व्यायाम करतो. मात्र यामुळे फायदा होण्याऐवजी जीवावर बेतण्याचीही पाळी येऊ शकते. ठाण्याच्या गोल्ड जिम येथे work out करतानाच एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रतिक परदेशी असं या तरुणाचं नाव असून तो अवघ्या 28 वर्षांचा होता.

काय घडलं नेमकं?

महागिरी येथे राहणारा प्रतिक गोल्ड जिममध्ये जात होता.

पीळदार शरीरयष्टीसाठी तो work out करत असे.

मात्र मधल्या काही काळात तो gym ला आला नव्हता.

त्यानंतर 17 जानेवारी रोजी जवळपास 10  दिवसांनी तो पुन्हा gym ला आला.

आल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच work out  करायला सुरूवात केली.

मात्र व्यायम करत असतानाच तो अचानक खाली कोसळला.

Gym मधील इतर सहकाऱ्यांनी त्याला डॉक्टरकडे नेलं.

मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हा मृत्यू High stroke मुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.

 

का होतं असं?

केवळ work out मुळे body तितकीशी पुष्ट होत नाही. त्यासाठी अनेकवेळा proteins चं सेवन करावं लागतं. काही वेळा steroids ची injections ही घेतली जातात. मात्र या सर्व गोष्टी तब्येतीला मानवत आहेत की नाही, याचा विचार सहसा तरुण करत नाहीत. अनेकदा योग्य प्रमाणात सकस आहार घेतला नसतानाही heavy work out केला जातो. अनेक दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा work out सुरू करताना एकदम पहिल्याइतका heavy  work out  करणं हानीकारक असतं. त्याचा ताण स्नायूंवर आणि हृदयावरही येत असतो. त्यामुळे heavy diet फॉलो करणारे आणि heavy work out  करणाऱ्यांनी अत्यंत सावधपणे व्यायाम करणं आवश्यक असतं. रूबाबदार दिसण्याच्या नादात जीव गमावण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर heavy work out करत असाल, तर सावधपणे करा. Gym मधील instructor ला आपल्या व्यायामाची पूर्वकल्पना द्या आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास weight lifting सारखे किंवा cardio सारख्या exercise टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *