Fri. Jan 21st, 2022

राजा हरिसिंगच्या वंशजाचाही केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा!

कलम 370 हटवण्यासंदर्भात राज्यसभा आणि लोकसभेत निर्णय घेण्यात आला. त्याला विरोधकांनी विरोध केला, तरी अखेर दोन्ही सदनांमध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आला. कलम 370 वरून काँग्रेसमध्येही उभी फूट पडलेली दिसली. काँग्रेसने जरी कलम 370 हटवण्याला विरोध केला असला, तरी ज्योतिरादित्य सिंदिया, मिलिंद देवरा यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी कलम 370 चं समर्थन केलंय.

काँग्रेसच्या या नेत्यांबरोबरच काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेतेही कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत. हे नेते म्हणजे जम्मू-काश्मीरचा शेवटचा राजा हरी सिंग याचे वंशज करण सिंग.

काय म्हणाले करण सिंग?

केंद्र सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा नाही.

त्यावर टीका करणं योग्य नाही.

यासंदर्भात निर्णय घेण्याची घाई झाल्याने आम्हाला धक्का बसला.

यात अनेक गोष्टी नाहीत. मात्र म्हणून त्यावर केवळ टीका करणं योग्य नाही.

संपूर्ण परिस्थितीचा विचार केल्यावर अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

1965 साली आपणही यासंदर्भात सूचना केली होती.

मात्र त्याचवेळी काश्मीरमध्ये अटक केलेल्या नेत्यांनाही आता मुक्त करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *