नाशिक शहरात गुरुवारपासून हेल्मेट सक्ती

नाशिक शहरात गुरुवारपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहनचालकाने विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्यांदा वाहनाचालक विनाहेल्मेट दुचाकी चालवताना आढळल्यास त्यास एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी थेट परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो. वाहन चालकाने दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकाचे वाहन ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये दुचाकी चालवताना वाहनचालकाने हेल्मेट वापरणे सक्तीचे झाले आहे अन्यथा, हेल्मेट सक्तीसाठी नाशिक पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहे.
नाशिकमध्ये गुरुवारपासून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर थेट दंडात्मक कारवाईला नाशिक पोलिसांकडून सुरुवात केली आहे. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आले तर अशा दुचाकीस्वारांना दुप्पट दंड म्हणजेच १ हजारांचा दंड भरावा लागेल शिवाय त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द होणार आहे.
नाशिकमध्ये मंगळवारपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार होती. मात्र वाहनचालकांना मुभा देण्यात आली होती. त्यामुळे आता गुरुवारपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. तसेच शहरात १२ ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना दोन तासांचे समुपदेशन केले जात आहे.