Tue. Mar 9th, 2021

चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे पुणेकरांना ५ रुपयांत घरपोच पोळीभाजी

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान अनेक ठिकाणी जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामध्येही अशा प्रकारची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पाटील यांनी आपल्या मतदारसंघात यासाठी घरपोच पोळीभाजी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.  

आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील पुणेकरांसाठी लॉकडाऊनदरम्यान नवा उपक्रम सुरू केला आहे. गरजू नागरिकांना ५ रुपयांत घरपोच पोळी भाजी पोहोचवण्याचा उपक्रम येथे राबवला जात आहे. सकाळी १० वाजपर्यंत पोळी भाजीची ऑर्डर देणं आवश्यक आहे. या पोळ्या दुपारी १ वाजता घरपोच मिळतील. तसंच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑर्डर्स दिल्यास रात्री ९ वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळेल. ‘आ. चंद्रकांतदादा मदत गट १’ तर्फे ही सुविधा पुरवण्यात येत आहे. ८२६२८७९६८३  या नंबरवर त्यासाठी संपर्क साधायचा आहे.

तसंच औषधांचा पुरवठा करण्याचं कामही ‘आ. चंद्रकांतदादा मदत गट २’ तर्फे करण्यात येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसार मिळणार दिलेली औषधं २५% सवलतीच्या दरात पुरवली जाणार आहेत. त्यासाठी ९९२२०३७०६२ हा क्रमांक आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या क्रमांकावर प्रिस्क्रिप्शन, नव, पत्ता, मोबाईल नंबर Whatsapp केल्यास दुसऱ्या दिवशी औषधे मिळतील.

मात्र याचा लाभ केवळ गरजूंनीच घ्यावा, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *