अखेर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त…

सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. ठाकरे सरकारचा हा मोठा निर्णय असल्याचं माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठका सुरु होत्या. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. शिवाय हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी दिली आहे.
यापुर्वी भाजपने गृहमंत्री अनिल देशमुखांना हटविण्याची जोरदार मागणी केली होती. तर दुसरीकडे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती.राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. तर या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु
झाली होती. सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली आहे. मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंगाशी आल्याचं स्पष्ट झालेल आहे. गृहखात्याकडून मुंबई पोलिस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांना हटविण्यात आले आहे तर सध्याला पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली आहे.