Thu. Apr 22nd, 2021

ईद आणि स्वातंत्र्य दिनी देशातील मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट

ईद आणि स्वातंत्र्यदिनी मोठा बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये हा बंदोबस्त करण्यात आला आहे.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे हा ऐतिहासीक निर्णय मानला जात आहे. राज्यसभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली तर लोकसभेतही याला मंजुरी देण्यात आली. हे कलम रद्द झाल्यामुळे पाकिस्तानमध्येही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ईद आणि स्वातंत्र्यदिनी मोठा बंदोबंस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये हा बंदोबस्त करण्यात आला आहे.

विध्वंसक हल्ल्याची शक्यता

ईद आणि स्वातंत्र्य दिनी देशातील मुंबईसह 15 प्रमुख शहरांमध्ये मोठा घातपात घडवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी (आयबी) दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्यात आल्याने जळफळाट झालेला पाकिस्तान हल्ला करणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सोपवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना  या हल्ल्यासाठी तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नुकताच पुलवामा हल्ला झाला त्यानंतर सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. त्यात काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्यात आल्याने सीमेवर आणि भारतात अलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून आलेल्या माहितीला गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

आता दहशतवाद्यांनी ईद आणि स्वातंत्र्य दिन तोंडावर आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि लष्कराला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *