एकनाथ खडसेंवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले?- मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सवाल
जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
एकनाथ खडसेंवरील आरोपांच्या चौकशीचे काय झाले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत राज्य सरकारनं काय पावलं उचलली? सरकार त्याबाबत काय करणार आहे असा सवाल उच्च न्यायायलानं सरकारला केला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला. याप्रकरणी त्यांनी जनहित याचिकाही दाखल केली.
मात्र, ही याचिका राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं सांगत ती फेटाळून लावावी, अशी विनंती खडसेंनी न्यायालयाकडं केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयानं राज्य सरकारला धारेवर धरलं. ‘खडसेंवरील आरोपांची सरकारनं नेमकी कोणत्या प्रकारे दखल घेतली आहे, हे स्पष्ट करावं,’ असे निर्देश खंडपीठाने दिले.