Fri. Oct 23rd, 2020

Ladies only… जुगार अड्डा! नागपुरातला प्रकार…

पुरुषांचे जुगार अड्डे हा प्रकार काही नवीन नाही. अशा जुगार अड्ड्यावर पोलीस नेहमीच कारवाई करत असतात. मात्र, नागपुरातील एका वेगळ्या जुगार अड्ड्याची सर्वत्र चर्चा आहे. हा जुगार अड्डा आहे श्रीमंत महिलांचा. नुकताच जरिपटका पोलीसांनी या हायप्रोफाईल महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि चार महिलांना अटक केली. तर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी झाला.

जुगार अड्ड्यावर ‘असा’ प्रकार!

नागपुरातील तोटिया चौकातील एका इमारतीत हा जुगार अड्डा सुरु होता.

याची माहिती पोलीसांना मिळाली आणि जरिपटका पोलिसांनी छापा टाकला.

यात चार महिलांना जुगार खेळताना अटक केली.

तर दोन महिला खिडकीतून पळून गेल्या.

जुगार अड्ड्यावरुन पोलीसांनी 30 हजार रुपये रोकड आणि जुगार साहित्य जप्त केलंय.

गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरु होता.

या अड्ड्यावर दारू आणि हुक्का सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती आहे.

नागपूर पोलीस पुरुषांच्या जुगार अड्ड्यावर नेहमीच छापा टाकतात आणि कारवाई करतात.

मात्र, महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचा गेल्या काही वर्षांतला नागपूर पोलीसांचा हा पहिलाच अनुभव आहे.

पोलीसांच्या या कारवाईनं पॉश इमारतीत अशाप्रकारे जुगार अड्डा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *