ढगफुटीनंतर हिमाचल प्रदेशात मृत्यूचे तांडव; 2 बस मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून 46 प्रवाशी जागीच ठार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीने मृत्यूचे तांडव घातले. शनिवारी रात्री ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात महामार्गावर थांबलेल्या २ बस मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप
झाल्या आहेत.
या दुर्दैवी घटनेत 46 प्रवाशी जागीच ठार झालेत. 46 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यातील 23 जणांची ओळख पटली आहे.
अद्यापही घटनास्थळी मदत कार्य सुरु आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली.