Thu. Jan 28th, 2021

हिमाचल प्रदेशात भूस्खलनात दोन बसेस अडकल्या; 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात दोन बसेस अडकल्या आहेत. दोन्ही बसमध्ये सुमारे 50 यात्रेकरू प्रवास करत होते.

 

या दुर्घटनेतील 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत 50 जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे.

 

शनिवारी रात्री ही घटना झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दोन्ही बस जोगिंदरनगरजवळ कोटरुपी येथे थांबल्या होत्या.

 

त्याचवेशी ढगफुटी आणि भूस्खलन होऊन डोंगराचा एक मोठा भाग बसवर येऊन आदळला आणि ही बस 200 मीटर खोल दरीत कोसळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *