Sat. Apr 17th, 2021

महाराष्ट्र LICच्या परिक्षेत हिंदीची जागा आता मराठी भाषेला

महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये (LIC) सहाय्यक पदांसाठी भरती सुरू होणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्रात पूर्व आणि मुख्य परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत होणार होती. मात्र आता हिंदी भाषेची जागा ही मराठी भाषा घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबतचे आश्वासन LICच्या व्यवस्थापनाने भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानिक लोकाधिकारी समितीला दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

LICमध्ये सहाय्यकांची साडेआठ हजार पदे भरण्यात येणार असून महाराष्ट्रात 1100 पदे आहेत.

या पदांसाठी 100 मार्कांची पूर्व परिक्षा असून त्यामध्ये 40 मार्क इंग्रजी किंवा हिंदी भाषेच्या कौशल्यासाठी तर 200 गुणांच्या मुख्य परिक्षेत हिंदी भाषेसाठी 40 गुण आहेत.

परंतू दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात हिंदीऐवजी तेथील प्रादेशिक भाषेत असणार आहे.

त्यामुळे राज्यातील LICच्या परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *