Tue. Oct 27th, 2020

हिंगणघाट जळीतकांड : आरोपीला न्यायालयीन कोठडी

हिंगणघटच्या जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यांची पोलीस कोठडी आज संपली. पुढील तपासाकरिता आज पुन्हा त्याला हिंगणघाटच्या कोर्टात सकाळी 6 वाजता हजर केलं गेलं. आरोपीला संतापाच्या भरात लोकांकडून मारहाण होण्याची भीती लक्षात घेवून पोलिसांनी सकाळीच आरोपीला कोर्टात हजर केलं गेलं.

आरोपीला 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठड़ी सुनावण्यात आली. पोलिसांनी कोठड़ी न मागितल्याने न्यायालयीन कोठड़ी दिली गेली. आता आरोपीची साक्षीदारांसमोर ओळख परेड होणार आहे. आता पोलिसांनी आरोपीसाठी पोलिस कोठड़ी मागू नये, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

आरोपीचं आरोपपत्र अजूनपर्यंत एकाही वकिलाने घेतलेलं नाही. हिंगणघाटच्या वकील बार असोसिएशनने बहिष्कार टाकत या घटनेचा निषेध केला होता.

वर्धा जिल्हातील सर्व वकीलांनी या घटनेचा निषेध करत वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे.

आरोपी विकेश नगराळेच्या आजपर्यंतच्या पोलीस कस्टडी मध्ये पोलिसांनी त्याच्याकडून घटनेसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त केलं आहे.

घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि शूज, पेट्रोलची बॉटल कापण्यासाठी वापरलेलं कटर, वापरलेलं लायटर याशिवाय घटनेच्या वेळी आरोपीच्या खिशात असलेले 30 रुपये जप्त झाले आहे. आरोपीच्या चौकशीची मुभा पोलिसांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *