Sun. Oct 24th, 2021

मुंबईच्या ‘या’ आराध्य देवीचा इतिहास, नक्की वाचा

Navratri 2018 Jai Maharashtra news

Navratri 2018 Jai Maharashtra news

सध्या नवरात्री उत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहाने सुरु आहे, मुंबईतही नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.

तसेच मुंबईतल्या अनेक मंदिरात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात, 9 दिवस मुंबईतील विविध मंदिरात भक्तिमय आणि आनंदच वतावरण पाहायला मिळतं.

मुंबईच प्रमुख मंदिर म्हणजे ‘मुंबादेवी’ म्हणजेच मुंबईची आराध्य दैवता या मंदिरात नवरोत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी रोज लाखो नागरिक मुंबईत नोकरीसाठी येतात तर काहीजण मुंबई फिरण्यासाठी, मात्र मुंबईत आल्यानंतर मुंबईची जी रक्षणकर्ती आहे त्या देवीच दर्शन घ्यायला लोक आवर्जून येतात.

काय आहे मुंबा देवीचा इतिहास

  • मुंबईची कुलदेवी म्हणून मुंबादेवी ला मानलं जात.
  • याच देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई हे नाव मिळाल आहे.
  • मुंबादेवी हे मंदिर दक्षिण मुंबई भागात भुलेश्वर परिसरात आहे.
  • गेली 400 वर्ष पुरातन अस हे मंदिर आहे, मुंबादेवी मंदिर हे सुरवातीच्या काळात विकटोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसटीएम स्टेशन जिथे आहे तिथे होते नंतर ब्रिटिशांनी या मंदिराची स्थापना भुलेश्वरला केली.
  • कोळ्यांची देवी म्हणूनही मुंबादेवी प्रसिद्ध आहे.

नवरात्री उत्सवात या मंदिरात विशेष गर्दी असते, तसेच या मंदिरात नवरात्रीत विशेष आरती आणि पारायण केले जाते.

नवरात्री निमित्त मंदिरही सुंदर सजवण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आल्यानंतर मुंबादेवी, देवी अन्नपूर्णा आणि देवी जगदंबा या 3 हि देवींच दर्शन घडत, या तीनही देवीची इथे स्थापना करण्यात आली आहे.

नवरात्रीत लाखो भाविक मंदिरात येतात, नवरात्रीच्या दिवसात या मंदिरात आरती आणि नवचंडी यज्ञ होते.

भाविकही मोठ्या भक्तीभावाने देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.

या मंदिरात आल्यानंतर मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते आणि विशेष म्हणजे नवरात्रीत या मंदिरात असलेलं एक वेगळं भक्तिमय वातावरण, त्यामुळे मुंबईच्या या मुंबादेवी मंदिराला तुम्हीही नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *