Fri. Mar 5th, 2021

‘कोलावरी डी’ स्टार धनुषची हॉलिवूड वारी

हॉलिवूड चित्रपटासाठी धनुष सज्ज!

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषची हॉलिवूड वारी हा लवकरच बिग बजेट चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. धनुषच्या अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. भारताच नाही तर जगात त्याला ‘कोलावरी डी’गाण्यानी एक ओळख निर्माण करून दिली. धनुषने दाक्षिणात्य चित्रपटात खूप काम केलं आहे. शिवाय त्यानी बॉलिवडूमध्ये देखील काम केलं आहे. आता धनुष हा हॉलिवूडमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. धनुष हा लवकरच एक हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. त्याच्यासोबत क्रिस एव्हान्स (Chris Evan), रेयान गॉसलिंग (Ryan Gosling) आणि (Ana de Armas) हे नावाजलेले कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. ‘द ग्रे मॅन’असं या चित्रपटाचं नाव आहे.


हा एक स्पाय सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी नेटफ्लिक्सने ट्वीट करून माहिती दिली आहे. धनुषचा या चित्रपटाचे बजट २०० मिलियन डॉलर अर्थात साधारण १५०० कोटींचं बजेट आहे. धनुषचा हा चित्रपट ‘द ग्रे मॅन’ मार्क ग्रिनी (Mark Greaney) या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे पटकथा जो रुसो (Joe Russo) ,ख्रिस्तोफर मार्कस आणि स्टिफन मॅकफिली यांनी लिहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *