Sun. Mar 7th, 2021

कचऱ्यात टाकलेल्या बाटल्यांपासून ‘त्याने’ बनवलं स्वप्नातलं घर

आपण आपली तहान भागल्यानंतर अगदी सहजपणे पाण्याची बॉटल कचऱ्यामध्ये फेकून देतो. मात्र जर तुम्हाला कुणी कचऱ्यामध्ये फेकून दिलेल्या बॉटल पासून आपलं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं सांगितलं तर? होय, हे खरं आहे. पुण्यातील राजेंद्र इनामदार या अवलियाने हे शक्य करून दाखवलं आहे.

आपलं स्वतःचं घर सगळ्यांपेक्षा हटके असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल काही सांगता येत नाही. असंच पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सिंहगड घेरा गावात राजेंद्र इनामदार या अवलियाने सर्वांपेक्षा हटके घर बांधलं आहे. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे घराच्या भिंती बांधण्यासाठी विटांऐवजी चक्क कचर्‍यात फेकून दिलेल्या 70 हजार पाण्याच्या बॉटलचा वापर करण्यात आलाय.

प्लास्टिकचा रियुज आणि रिसायकल ही संकल्पना डोक्यात ठेवून सिंहगडावरून तसंच इतरत्र कचराकुंडीत टाकून दिलेल्या बॉटल्स,  कसलीही लाज न बाळगता गोळा केल्या गेल्यात. 

भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या एका विटेची किंमत 7 रुपये इतकी येते याउलट जर बॉटलचा वापर केला तर हीच किंमत साडेतीन ते चार रुपयापर्यंत पडते.

बॉटल तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक जर जमिनीत पुरले तर त्याला डीकंपोज व्हायला साडेचारशे ते हजार वर्षे इतका कालावधी लागतो.

अशाप्रकारे घरासाठी बॉटल्सचा वापर केल्यानं पर्यावरणाची हानी टाळण्यासं मदत देखील होते. पर्यावरणासाठी घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर याहून चांगला काय असू शकतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *