Sat. Feb 29th, 2020

उत्तर प्रदेश थरारनाट्य : मुलांना ओलिस ठेवणारा ठार, मुलांची सुखरूप सुटका

उत्तर प्रदेशात ओलिस ठेवलेल्या मुलांची तब्बल 8 तासांनंतर सुटका झाली आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे 20 मुलांना ओलिस ठेवणाऱ्या आरोपीला अखेर पोलीसांनी ठार करत मुलांना सुखरूप सोडवलं. मयत आरोपीचं नाव सुभाष बाथम असल्याचं सांगण्यात येतंय.

काय होता हा प्रकार?

आरोपी सुभाषच्या मुलीचा वाढदिवस होता.

त्या निमित्ताने मुलांना सुभाषने आपल्य़ा घरी बोलावलं होतं.

मात्र त्यानंतर देशी कट्टा आणि बॉम्बच्या सहाय्याने त्याने मुलांना ओलिस धरलं.

पोलिसांनी मुलांना सोडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. तसंच बॉम्बही फेकला.

यामध्ये पाच पोलीस कर्मचारी आणि सहा नागरिक जखमी झाले.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अखेर NSG कमांडोंचं पथक पाचारण करण्यात आलं.

दरम्यान स्थानिकांनी दगडफेक करत आरोपीच्या घराचं दार मोडकळीस आणलं.

याचाच फायदा घेत कमांडो घरात घुसले.

यावेळी झालेल्या चकमकीत सुभाष बाथम ठार झाला. यानंतर सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली

उत्तर प्रदेश पोलिसांना 10 लाखांचा इनाम सरकारने जाहीर केलाय.

मयत सुभाष बाथम याने 2001 सालीही एका व्यक्तीची हत्या केली होती. त्यावेळी त्याला अटकही झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *