२० हॉटेल कर्मचार्यांना कोरोना
२० हॉटेल कर्मचार्यांना कोरोना

चेन्नई : चेन्नईच्या एमआरसी नगरमधल्या हॉटेल लीला पॅलेसच्या २० कर्मचार्यांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आली आहे. शहरातील स्टार हॉटेल्समध्ये काम करणार्या ११४ कर्मचाऱ्यांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आल्याची माहीती ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनं दिली आहे.
लीला पॅलेस हे हॉटेल चेन्नईमधील उच्च प्रोफाइलच्या राजकीय आणि व्यवसाय बैठकींसाठी एक प्रमुख स्थान आहे. या आधी आयटीसी ग्रँड चोलमध्ये १५ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ दरम्यान ९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून लक्झरी हॉटेल्समध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनं अहवालाच्या तुलनेनुसार आयटीसी ग्रँड चोला आणि लीला पॅलेसशिवाय अन्य ठिकाणीही कोरोनाचे कमी रुग्ण असल्याची माहिती दिली आहे.