Wed. Jan 19th, 2022

बुलडाण्यात बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराची हत्या

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास चक्रे फिरवीत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तर, आपल्याला बिडी दिली नाही म्हणून आपण त्याला ठार केल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका तासातच चौकशी करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शेगाव शहरातील श्री चौक येथील दार्जिलिंग चहाच्या दुकानासमोर दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याची माहिती दुकान मालकाने पोलिसांना दिली. त्यावेळी पोलीस तत्काल घटनास्थळी पोहचले. यावेळी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या माहितीनुसार एका युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मृतकाला बिडी आणि पाणी मागितले असता त्याने दिले नाही म्हणून आपणच त्याला दगडाने ठेचून ठार केल्याची कबुली त्यांने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *