Thu. Nov 26th, 2020

…आज रात्री तुम्ही हॉटेलमध्ये जेवायचा विचार करत असला तर ही बातमी वाचाच

 वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आज रात्री तुम्ही हॉटेलमध्ये जेवायचा विचार करत असाल तर साडेअकराच्या आतच तुम्हाला जेवण आटपावं लागेल.

 

मध्यरात्री देशभरात लागू होत असलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी साडेअकरानंतर हॉटेल्स बंद राहतील.

 

जीएसटी लागू करण्यासाठी हॉटेल्सना आपल्या बिलिंग यंत्रणेत बदल करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईतली जवळपास 7 हजारपेक्षा जास्त हॉटेल्स 12 च्या आतच बंद

होतील.

 

रात्री साडे अकरा वाजता हॉटेलमध्ये शेवटची ऑर्डर घेतली जाईल. जीएसटीमुळे साध्या हॉटेलमध्ये 12 टक्के, एसी हॉटेलमध्ये 18 टक्के तर पंचतारांकित हॉटेलमध्ये 18

टक्के कर लागू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *