Thu. Mar 4th, 2021

Whatsapp युजर्ससाठी आनंदाची बातमी! अखेर ‘हे’ फीचर आलं…

स्मार्टफोन वापरणाऱ्या बहुतके युजर्सच्या मोबाईलमध्ये असणारं महत्त्वाचं app म्हणजे Whatsapp. मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं हे app आहे. Whatsapp वेळोवेळी अपडेट होत असतं आणि युजर्ससाठी अनेक महत्त्वाची फीचर्सही Whatsapp पुरवत असतं. आता युजर्ससाठी Whatsapp ने एक असं फीचर आणलंय, ज्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. Whatsapp व आता Dark Mode फीचर सुरू करण्यात आलं आहे. Android आणि iOS च्या युजर्ससाठी हे Dark Mode फीचर सुरू करण्यात आलं आहे.

काय आहे ‘डार्क मोड’ फीचर?

Deark Mode मध्ये Whatsapp ची बॅकग्राऊंड काळी होते आणि टेक्स्ट ग्रे रंगात दिसतं.

यामुळे Whatsapp वापरताना स्क्रीनचा प्रकाश कमी होतो.

त्यामुळे युजर्सच्या डोळ्यांना जास्त वेळ मोबाईल बघूनही त्रास होत नाही.

व्हाईट आणि ब्राईट बॅकग्राऊंडमुळे युजर्सच्या डोळ्याला त्रास होत असतो.

Dark Mode मुळे Brightness कमी होतो आणि रंगसंगती बदलते. त्यामुले डोळ्यांना त्रास होत नाही.

फोन स्क्रीनचा लाईट कमी झाल्यामुळे फोनची बॅटरी जास्त सेव्ह होते.

Dark Mode Feature हे युजर आपल्याला हवं तेव्हा on /off करू शकतो.

कसं सुरू कराल Dark Mode?

हे फीचर सुरू करण्यासाठी Whatsapp अपडेट करणं आवश्यक आहे.

त्यानंतर Whatsapp वर जा.

उजवीकडे Top ला तीन उभी टिंबं असणाऱ्या Menu ऑप्शनवर क्लिक करा.

त्यातील Settings हा ऑप्शन निवडा.

Settings screen मध्ये Chats ऑप्शनमध्ये जा.

Chats मध्ये Display च्या खाली Theme वर जा.

इथे तुम्हाला Light आणि Dark असे पर्याय दिसतील.

Dark या option वर क्लिक केल्यावर Dark Mode सुरू होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *