पुन्हा एकदा झळकणार रुपेरी पडद्यावर ‘रामायण’

काही दिवसापासून ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यापुर्वी अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकले आहे. आता पुन्हा एकदा ‘रामायण’ हे प्रेकक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ला प्रेक्षकांनी खूप पसंत पडली होती. ‘स्पॉट बॉय’नुसार, सध्या कलाविश्वात आणि सोशल मीडियावर मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.
या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘रामायण’ हा थ्रीडी चित्रपट असून याचं बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.‘रामायण’ या चित्रपटात दीपिका पदुकोण सीतेची भूमिका साकारणार आहे. तर हृतिक रोशन प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे.