ह्रतिक आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित
२ ऑक्टोबरला ‘वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे

ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या चाहत्यांना त्यांच्या नव्या गाण्याची किंवा सिनेमाची उत्सुकता असते. आपल्या अभिनय आणि डान्यच्या जोरावर ह्रतिक आणि टायगर श्रॉफने प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व निर्माण केले आहे. बॉलिवूड डान्स म्हटलं की, ह्रतिक आणि टायगर श्रॉफ यांच्याच डान्सची चर्चा असते. त्यांच्या नृत्यशैलीच्या आधारावर चाहत्यांच्या मनावर छाप उमटवली आहे. आता हे दोन्ही कलाकार ‘यशराज्य फिल्म्स’ च्या आगामी ‘वॉर’ सिनेमा मध्ये एकत्र झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.
ह्रतिक आणि टायगर श्रॉफ पहिल्यादाच एकत्र झळकणार
वॉर या चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.
सिद्धार्थ आनंदाने वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे.
२ ऑक्टोबरला वॉर हा चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे.
ह्रतिक ने त्याच्या टि्वटर अकाऊंटवरुन हे गाणे शेअर केले आहे.
It’s almost time for #JaiJaiShivshankar! SONG OUT TODAY at 10 AM on https://t.co/d7cCZ3RiPa @iTIGERSHROFF @Vaaniofficial @VishalDadlani @ShekharRavjiani @Benny_Dayal #Kumaar @BoscoMartis @csgonsalves #SiddharthAnand #HrithikVsTiger @yrf
— Hrithik Roshan (@iHrithik) September 21, 2019
या गाण्यात ह्रतिक आणि टायगर रंगपंचमी खेळताना दिसत आहे.
गाण्यामध्ये दोघेही एकत्र डान्स करताना दिसत आहेत.
ह्रतिक आणि टायगर श्रॉफने या गाण्यासाठी तीन आठवडे मेहनत घेतली आहे.
सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हारयल होत आहे.
या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गाण्यामध्ये ५०० बेस्ट बॅकग्राऊंड डान्सरची निवड करण्यात आली आहे.
ह्रतिक आणि टायगर श्रॉफने एकामेकांचे पोस्टर असलेले टी-शर्ट घातले असून, याबाबतीत मजेदार चर्चा सुरु आहे.
यामध्ये टायगरने घातलेल्या टी-शर्टची सर्वाधिक चर्चा रंगली होती.
टायगरने घातलेल्या टी-शर्टवर ह्रतिकचा क्रिश चित्रपटातील फोटो वापरला असून या फोटोला आपली भीती मुखवट्यामागे लपवत आहेस का? असे ही कॅप्शन दिले आहे.
काही दिवसापूर्वी ह्रतिक आणि टायगरने मजेशीर आणि अनोख्या पद्धतीने वॉर या सिनेमाचे प्रमोशन केले आहे.
सिद्धार्थ आनंदाने वॉर चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे.