Mon. Apr 6th, 2020

अनोळख्या प्रवाशाकडून परभणीमध्ये घडले माणुसकीचे दर्शन

समाजात माणुसकी निभवण्याच्या अगदीच कमी घटना घडतात. अशीच एक घटना परभणीमध्ये घडली आहे. बसस्थानकामध्ये सापडलेले अडीच लाख रूपये एका व्यक्तीने परत केले आहेत. या त्याच्या वर्तवणूकीमुळे माणुसकीचे दर्शन घडले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

परभणी बसस्थानकात सापडलेले अडीच लाखाचे दागिने आगार प्रमुखांकडे सुपूर्द करणाऱ्या अनोळखी प्रवाशाचे परभणीत सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र चर्चा ही होत आहे. मधुकर नाईक यांचे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परभणीच्या बसस्थानकात पडले होते. सापडलेले दागिने आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांच्याकडे सुपूर्द करून तो अनोळखी प्रवासी निघून गेला.

या दागिन्यांसोबत पावती आणि सांगली बँकेची पावती असल्याने पाटील यांनी सांगली बँके सोबत संवाद साधून त्यांना बोलावून घेत काही प्रवासी मित्रांच्या समक्ष अडीच लाख रुपयांचे दागिने मधुकर नाईक यांना परत केले.

त्या कामगिरीबद्दल या प्रवाशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *