Mon. Aug 15th, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती जगाच्या इतिहासात सापडणे मुश्कील – पंतप्रधान

महाराष्ट्रात ज्यांच्या नावाचा अखंड गजर होतो अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले आहे.

मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते.

ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटतात. जय शिवराय.’

या ट्विटमध्ये मोदींनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये मोदींनी वेळोवेळी आपल्या भाषणांदरम्यान शिवाजी माहाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला आहे.

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यांनी अनेक संकटे असतानाही आपल्या योग्यता आणि क्षमतेच्या आधारे सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील आहे, ज्यांनी संघर्ष करत असतानाही सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.’

त्यापुढे मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या दाखला देत शिवाजी महाराजांची स्तुती केली आहे.

‘प्रभू रामांनी लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांची संघटन कौशल्य वापरून शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केले,’

असेही पंतप्रधान मोदींनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

दरम्यान आज देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.