‘माझ्यामागे ईडी नाही, कारण मी भाजपचा खासदार’

गेल्या दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांवर करत असताता. अशातच ‘माझ्यामागे ईड लागणार नाही कारण मी भाजपचा खासदार आहे. त्यापेएक्षा आमची कर्ज पाहिली की ईडी म्हणेल, ही माणसं आहेत की काय? अशी टिप्पणी भाजप खासदार संजय पाटील यांनी केली आहे.
भाजप नेते संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक नेत्यांनी कर्ज आणि संपत्तीवर केलेल्या भाष्यवरून बोलताना संजय पाटील म्हणाले, ‘मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे माझ्यामागे ईडी लागणार नाही.’ असे म्हणत त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली.
‘आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला हे मला न विचारता काँग्रेस नेत्यांना विचारा. पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही.’ असेही संजय पाटील म्हणाले.