तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहवंसं वाटतं – आझम खान

समजावादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी लोकसभेत तीन तलाक विधेयकावर भाषण करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला. तू इधर- उधर की ना बात कर असे बोलत आझम खान भाषणाला यांनी सुरुवात केली. यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यामुळे रमा देवी यांना उद्देशून वक्तव्य केल्याने भाजपा खासदारांनी लोकसभेत मोठा गदारोळ केला.
काय म्हणाले आझम खान ?
लोकसभेत तीन तलाक विधेयकावर चर्चा सुरू होती.
या चर्चेमध्ये बोलताना समाजवादी पक्षाचे खादार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्या केले आहे.
तू इधर- उधर की ना बात कर असे बोलत आझम खान भाषणाला यांनी सुरुवात केली.
अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या.
त्यामुळे आझम खान यांनी रमा देवी यांना उद्देशून बोले असल्याने लोकसभेत गदारोळ झाला.
‘तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहवंसं वाटतं’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
आझम खान यांच्या वक्तव्यावर रमा देवी यांनी आक्षेप घेत आझम खान यांना बोलण्याची पद्धत नसल्याचे म्हटलं आहे.
त्यावर तुम्ही खूप आदरणीय आहात आणि बहिणीसारखेही असे आझम खान यांनी म्हटलं.
लोकसभेतील सदस्यांनी गदारोळ घातला आणि आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
मात्र मी काही चुकीचं बोलो नसून मी माफी मागणार नाही.
तसेच जर मी चुकीचं बोलो असलो तरी मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे आझम खान यांनी सांगितले.