Fri. Dec 3rd, 2021

राज्याला प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची गरज आहे – राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभा चांगल्याच गाजल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे काय भूमिका घेतात, याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. मात्र पुण्यामधील पहिली सभा पावसामुळे रद्द करावी लागली.

मुंबईमध्ये दिवसाला दोन सभा करताना पहिली सांताक्रुज येथे त्यांनी सभा घेतली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मनसेला राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष बनण्यासाठी मतदान करा, असं आवाहन केलं.

काय म्हणाले सांताक्रुजच्या सभेत राज ठाकरे?

मला सभेपेक्षा प्रवासाला अधिक वेळ लागतो. काल पाऊस पडला आणि पूर्ण वाट लावली. रोजच्या रोज शहरं बरबाद होत आहेत. सरकारची नियोजनं चुकत आहेत. विरोधी पक्ष नेते उरले नाहीत तेच भाजपमध्ये गेलेत. मग जनतेचे प्रश्न मांडणार कोण?

एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकांचे घोटाळे होताहेत

PMC बँकेच्या अधिकारीपदावर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत.

न्यायालयाकडून न्याय मिळेल का हा प्रश्न आहे. रोजगार आणि उद्योगधंद्याचे काय झाले

महाराष्ट्राला यावेळी कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे.

सत्ता जेव्हा अवाक्यात येईल, असं वाटेल, तेव्हा सत्ता मागण्यासाठी येईन.

आता मला विरोधीपक्ष म्हणून काम करायचंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *