Fri. Jan 28th, 2022

‘पदासाठी कुणाकडे हात पसरवणार नाही’ – पंकजा मुंडे

‘आरक्षणाशिवाय निवडणूक हा ओबीसींवर अन्याय’ – पंकजा मुंडे

  भाजप पक्षाने विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळीसुद्धा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे या निर्णयानंतर पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

  बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते पंकजा मुंडे यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे. त्या म्हणाल्या, ‘माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोके ठेवून नतमस्तक होईल. पण, पदासाठी कुणासमोर हात फैलावून मागणी करणार नाही’. तसेच त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. पद असो वा नसो, मी प्रथम जनतेची सेवा करले. परंतु पदासाठी कुणासमोरच हात पुढे करणार नाही, आमच्या रक्तात तशी सवय नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *