Jaimaharashtra news

साध्वी प्रज्ञाला मनापासून माफ करणार नाही – मोदी

मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेता कमल हासन यांनी नथुराम गोडसे हे दहशतवादी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. कमल हासन यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. भोपळाचे भाजपाचे उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटलं होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.

नथुराम गोडसे भारताचे पहिले हिंदू दहशतवादी; कमल हसन यांचे वादग्रस्त विधान

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केल्याप्रकरणी कमल हासन यांनी गोडसे यांना दहशतवादी म्हटलं.
त्यांतर भाजपाच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोडसे देशभक्त होते आणि राहतील असे म्हटलं.
त्यामुळे भाजपा पक्षावर घणाघाती टीका करण्यात आली होती.
तसेच प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याशी भाजपाचा काही संबंध नाही असेही स्पष्ट सांगितले.
भाजपा नेत्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली.
गांधीबद्दल केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे.
त्यांनी मनापासून माफी मागितली तरी माफ करू शकत नाही असे मोदी म्हणाले आहे.
https://www.jaimaharashtranews.com/nathuram-godse-will-be-always-patriot/
Exit mobile version