शरद पवारांना सोडून जाणार नाही – जयंत पाटील

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्त्वाचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाजपाकडून ऑफर आल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मी शरद पवारांचा कार्यकर्ता असून त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अंगात प्राण असेपर्यंत मी शरद पवारांना सोडून जाणार नाही असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी मांडले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील ?
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना भाजपाकडून ऑफर आल्याचे प्रश्न विचारण्यात आला होता.
मी शरद पवारांचा कार्यकर्ता असून त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असल्याचे उत्तर जयंत पाटील यांनी दिले.
अंगात प्राण असेपर्यंत शरद पवार यांना सोडून जाणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
अनेक नेत्यांनी पक्ष सोडला तर पुन्हा उभा करता येतो असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
फोडाफोडीचे राजकराण भाजपा करत असल्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाल्याचे म्हटलं आहे.
राष्ट्रवादी-कॉंग्रेसमधून भाजपात प्रवेश करत असून त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नसल्याने जात असल्याचे म्हटलं आहे.
तसेच यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.