Tue. Mar 2nd, 2021

देशातील दुर्गम भागात लसी पोहोचवणार C-130J आणि AN-32

जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. आता यातचं एक दिलासादाक बातमी मिळाली आहे. भारतात दोन कोरोना प्रतिबंधक लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली असून सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनसाठी एकत्र काम करणार आहे. शिवाय भारतात सर्व भागांमध्ये लस पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वाहतूक ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात C-130J आणि AN-32 सारखी मोठी विमाने लसी पोहोचवण्यासाठी वापर करण्यात येणार आहेत. तसेच लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली जात आहे. वाहतुकी दरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. याबद्दल वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडिया टुडेला ही माहिती दिली. दुर्गम भागांमध्ये म्हणजे लडाख आणि अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यात लसी पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्स आपल्या ताफ्यातील मालवाहतूक विमानांचा वापर करण्यात येणार आहे.

हवाई मार्गाद्वारे लस पोहोचवण्यासाठी मोठया प्रमाणात व्यावसायिक विमानांचा वापर करण्यात येईल. सहसा व्यावसायिक विमाने लष्करी धावपट्ट्यांचा वापर करत नाही. मात्र एअर फोर्स या व्यावसायिक विमानांना लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्याची परवानगी देईल. देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी एअर फोर्सच्या विमानांचा वापर केला जाईल. योजनेनुसार, गरज पडली तर लस पोहोचवण्यासाठी एअरफोर्स आपल्या हेलिकॉप्टर्सचा सुद्धा वापर करतील. लस वाहतुकी संदर्भात अजून चर्चा सुरु आहे. लवकरच या बद्दल अतिम रुपरेषा ठरवली जाईल असे अधिकाऱ्यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *