Fri. Sep 25th, 2020

आयसीसीच्या टेस्ट रॅंकिगमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम

आयसीसीने नुकतीच टेस्ट रॅंकिंग जाहीर केली आहे. या रॅंकिंगमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला आपले पहिले स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे.

तर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणेची घसरण झाली आहे.

पुजाराच्या रॅंकिंगमध्ये एक स्थानाचे नुकसान झाले आहे. पुजाराची आयसीसीच्या ताज्या रॅंकिगनुसार ७९१ पॉइंट्सह सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

तर मुंबईकर अंजिक्य रहाणेला २ स्थानांनी घसरण झाली आहे. रहाणेची ७ व्या क्रमांकावरुन ९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रहाणे सध्या ७५९ पॉइंट्सह नवव्या क्रमांकावर आहे.

बॉलिंगमध्ये टीम इंडियाचा जस्प्रीत बुमराहला आपले सहावे स्थान कायम ठेवण्यास यश आले आहे. बुमराह ७९४ पॉईंट्सह सहाव्या क्रमांकावर काय आहे.

तर फिरकीपटू आर आश्विन ७७२ पॉईंट्ससह नवव्या क्रमांकावर आहे. तर मोहम्मद शमी ७७१ पॉइंट्ससह दहाव्या क्रमांकावर आहे.

मार्नस लाबुशेनची मुसंडी

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने आपल्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ तिसरा क्रमांक पटकावला आहे.

25 वर्षीय लाबुशेनने न्यूजीलंड विरुद्धच्या अंतिम टेस्टमध्ये 215 आणि 59 रन्सची खेळी केली.

या सीरीजमध्ये 549 रन करुन टॉप स्कोरर राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *